वैयक्तिक माहिती: विवाहेच्छुक उमेदवाराची वैयक्तिक माहिती, आपल्या ज्ञातीशाखेचे नाव (उदा: देशस्थ ऋग्वेदी) शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि जन्मपत्रिकेतील डिटेल्स हाताशी ठेवणे.
फेसबुक मेसेंजर ID: सायबर क्राईमच्या वाढत्या घटना पाहता स्वतःची सुरक्षा आणि प्रायव्हसी जपण्यासाठी मंगलाक्षता प्रोफाइलमध्ये संपर्कासाठी मोबाईल नंबर ऐवजी फेसबुक मेसेंजरचा वापर करण्याची आम्ही शिफारस करतो. विशेषतः मुलींच्या प्रोफाइलसाठी ही शिफारस आम्ही आवर्जून करतो. फेसबुक मेसेंजर हे व्हाट्सऍपप्रमाणेच काम करते. त्यातून मेसेजेस, फोटोज पाठवता येतात, व्हॉइसकॉल, व्हिडीओ कॉल करता येतात. आपला मोबाईल नंबर न देता सहजपणे संवाद साधता येणे हे मेसेंजरचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आपल्या प्रोफाइलमध्ये विशेषतः विवाहेच्छुक मुलींच्या प्रोफाइलमध्ये मोबाईल नंबर ऐवजी फेसबुक मेसेंजर आयडी पब्लिश करण्याची शिफारस आम्ही करतो. यासाठी आपला मेसेंजर आयडी रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये द्यावा लागेल. आपला मेसेंजर आयडी कसा शोधायचा याची सचित्र माहिती इथे मिळेल. अर्थात संपर्कासाठी मेसेंजर ऐवजी मोबाईल नंबर सुद्धा आपण देऊ शकता. मेसेंजर की मोबाईल नंबर ही निवड आपली स्वतःची असेल.
दोन फोटोज:विवाहेच्छुक उमेदवाराचे दोन स्पष्ट, हाय रिजोल्यूशन फोटोज तयार ठेवणे. यातील एक फोटो प्रामुख्याने चेहरा स्पष्ट दिसेल असा असावा आणि दुसरा उभ्या स्थितीतील पूर्ण फोटो असावा ज्यातून उंची आणि शरीरयष्टीची स्पष्ट कल्पना येईल.
अपलोड करण्यासाठी डॉक्युमेंट-१: विवाहेच्छुक उमेदवाराचे नाव, जन्मतारीख आणि जात या बाबींची पुष्टी करण्यासाठी शाळा / कॉलेज सोडल्याच्या दाखल्याचा (Leaving certificate) स्पष्ट फोटो तयार ठेवणे. हा फोटो रजिस्ट्रेशन फॉर्मसोबत अपलोड करायचा आहे. आधार कार्ड हे महत्वाचे KYC Document असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने कृपया आधार कार्ड अपलोड करू नये.
अपलोड करण्यासाठी डॉक्युमेंट-२: विवाहेच्छुक उमेदवाराच्या कायमच्या पत्त्याची (Permanant address) पुष्टी करण्यासाठी लाईट बील, टेलिफोन बील, घरपट्टी बील किंवा तत्सम एका डॉक्युमेंटचा स्पष्ट फोटो तयार ठेवणे. हा फोटो रजिस्ट्रेशन फॉर्मसोबत अपलोड करायचा आहे.
रजिस्ट्रेशन फॉर्म
हा फॉर्म मोठा असल्याने तो लोड होण्यास थोडा वेळ लागू शकतो. कृपया वाट पाहा.
रजिस्ट्रेशन फॉर्ममधील माहिती मुख्यतः मराठी देवनागरीमध्ये भरणे अपेक्षित आहे. ही माहिती जशी भरली जाईल तशीच प्रोफाइलमध्ये पब्लिश केली जाईल.